सकाळ डिजिटल टीम
हळद मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात जे यकृताची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी हळद आणि काळी मिरी कोमट पाण्यात मिसळून प्यायला हवे.
कारले यकृताची जळजळ कमी करण्यात मदत करते आणि तिथल्या चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. जेवणाच्या आधी कारल्याचा रस पिणे यकृतासाठी उत्तम आहे.
आवळा यकृताच्या कार्यात सुधारणा करते आणि त्यातील व्हिटॅमिन C यकृतासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळा रस नियमितपणे पिणे यकृतासाठी फायदेशीर ठरते.
हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात सेवन केल्याने यकृताचे कार्य चांगले राहते. यकृताच्या शुद्धीकरणासाठी खूप उपयुक्त ठरतात.
लसूणमध्ये सेलेनियम आणि अॅलिसिन असतात जे विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी लसूण चावून किंवा पाण्यासोबत घेण्याची पद्धत यकृतासाठी फायदेशीर आहे.
आले पचन सुधारते आणि यकृताचे कार्य वाढवते. यकृताच्या कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी आल्याचे सेवन नियमितपणे करणे आवश्यक आहे.
बीट यकृताच्या आरोग्याला लाभकारक आहे, कारण त्यात उपस्थित असलेले घटक यकृताच्या शुद्धीकरणास मदत करतात. यकृताच्या कार्याची क्षमता वाढवण्यासाठी बीट उपयुक्त आहे.
आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्या.