संतोष कानडे
आपल्या शरीरातील हार्मोन्स सातत्याने बदलत असतात. त्यानुसार आपला मूड बदलत असतो. चार हार्मोन्स आपल्या मूडवर काम करत असतात.
हार्मोन्स म्हणजे संप्रेरकं हे एक प्रकारे संदेशवाहक असतात. ते शरीरामध्येच तयार होत असतात.
आपल्या वर्तमान आयुष्यात हार्मोन्स काम करत असतात. त्यामुळेच माणसाचा मूड बदलत असतो.
हे हार्मोन्स शरीरामध्ये नैसर्गिकरित्या उत्तेजित करता येतात. त्याची माहिती असेल तर आपण कायम आनंदी आणि मनाप्रमाणे जगू शकतो.
ऑक्सिटॉसिन- हा हार्मोन माणसातील नात्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे कुटुंब किंवा मित्रांसोबत प्रेमान वागावं, पाळीव प्राण्यांसोबत खेळावं.
एन्डोर्फिन- तणाव किंवा वेदना थांबवण्यासाठी या एन्डोर्फिन हार्मोनचा उपयोग होतो. हे हार्मोन नैसर्गिकरित्या मिळवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. त्याशिवाय लैंगिक जीवन योग्य रितीने जगणं आवश्यक आहे.
डोपामाईन- आपल्यासोबत सकारात्मक गोष्टी घडल्यानंतर हे हार्मोन काम करतं.यासाठी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा, चांगली गाणी ऐका, आवडीचं अन्न खावं.
सेरोटोनिन- मावनी नैराश्येवर काम करणारं हे हार्मोन आहे. याचा समतोल राखण्यासाठी चालणं, धावणं, पोहणं आवश्यक आहे. निसर्गाच्या सानिध्यात जाणं, धान्य करणं आणि उन्हात उभं राहाणं कामाचं आहे.