Aarti Badade
रताळ्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे A, C, B6, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
अघुलनशील आणि विरघळणाऱ्या फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
रताळ्यामधील कॅरोटीनॉइड आणि बी6 रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात आणि हृदयरोगापासूनही संरक्षण करतात.
रताळ्यामधील लोह शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतो आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारतो.
बीटा-कॅरोटीनमुळे व्हिटॅमिन A ची कमतरता दूर होते, ज्यामुळे रात्रीची नजरही सुधारते.
फायबरमुळे पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे अनावश्यक खाणं टळतं – वजन कमी करण्यात मदत होते.
जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स एकत्रितपणे शरीराचं संरक्षण करतात.
ही माहिती सामान्य आरोग्य माहितीवर आधारित आहे. डॉक्टरांचा सल्लानेच आहारात बदल करा