उद्योजकानं ३०० शेतकऱ्यांचा सात बारा केला कोरा, एकट्यानं फेडलं कर्ज

सूरज यादव

शेतकरी कर्जमुक्त

गुजरातच्या अमरेली इथल्या एका उद्योजकानं ३०० शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं आहे. गेल्या ३० वर्षांपासून यामुळे शेतकऱ्यांना कोणतीच बँक कर्ज देत नव्हती.

Gujarat Businessman Makes 300 Farmers DebtFree After Three Decades

|

Esakal

३० वर्षांपासून कर्ज

१९९५ मध्ये गावातील सेवा सहकारी मंडळ बंद झाल्यानंतर ३०० शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली होते. त्यांना पीक कर्ज मिळत नव्हतं. आता या शेतकऱ्यांसाठी एक उद्योजक धावून आलेत.

Gujarat Businessman Makes 300 Farmers DebtFree After Three Decades

|

Esakal

२९० शेतकऱ्यांचं कर्ज फेडलं

अमरेली जिल्ह्यातल्या जीरा गावातील उद्योजक बाबूभाई चोडवाडिया उर्फ जीरावाला यांनी आईच्या पुण्यतिथीनिमित्त शेतकऱ्यांना मदत केली. २९० शेतकऱ्यांचं ३० वर्षांपासूनचं कर्ज त्यांनी फेडलं.

Gujarat Businessman Makes 300 Farmers DebtFree After Three Decades

|

Esakal

बँका कर्ज देत नव्हत्या

शेतकऱ्यांच्या नावावर १९९५मध्ये खोट्या कर्जामुळे बोजा होता. ही कर्जाची रक्कम ८९ लाखांवर पोहोचली होती. परिणामी इतर बँका त्यांना कर्ज देत नव्हत्या.

Gujarat Businessman Makes 300 Farmers DebtFree After Three Decades

|

Esakal

आईची इच्छा

कर्जाची रक्कम फेडल्यानंतर बाबूभाई म्हणाले की, माझ्या आईची इच्छा होती की कुणीतरी आनंदी होईल अशा कामासाठी पैशाचा वापर करावा. इतर उद्योजकांनीही शेतकऱ्यांना मदत करावी.

Gujarat Businessman Makes 300 Farmers DebtFree After Three Decades

|

Esakal

शेतकरी आनंदी

कर्जाचा बोजा कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. बाबूभाई हे देवाच्या रुपाने आल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. तसंच त्यांना १० पट मिळू दे अशी प्रार्थना केली.

Gujarat Businessman Makes 300 Farmers DebtFree After Three Decades

|

Esakal

सरपंच, खासदारांकडून कौतुक

जीरा गावच्या सरपंचांनी म्हटलं की, ८९ लाखांचं कर्ज फेडून बाबूभाईंनी मोठं काम केलंय. खासदार भरत सुतारिया यांनीही बाबूभाईंचं कौतुक करत इतर गावांसाठी हा आदर्श असल्याचं सांगितलं.

Gujarat Businessman Makes 300 Farmers DebtFree After Three Decades

|

Esakal

सातबारा कोरा

बाबूभाई जीरावाला यांच्या मदतीमुळे ३०० शेतकरी कर्जमुक्त झाले. इतकंच नाही तर त्यांचा सातबारा कोरा झाला. आता त्यांना इतर बँकांकडून पीक कर्ज घेता येणार आहे.

Gujarat Businessman Makes 300 Farmers DebtFree After Three Decades

|

Esakal

चाणक्याच्या टीप्स बनवतील तुम्हाला श्रीमंत, जीवनात मिळेल यश

Acharya Chanakya | sakal
इथं क्लिक करा