सकाळ डिजिटल टीम
केस गळती आणि टक्कल पडण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी काही विशिष्ट गोष्टी आहारात समाविष्ट करा.
खराब जीवनशैली, पोषणाचा अभाव, केमिकल प्रोडक्टसचा वापर आणि ताणतणाव यामुळे केस गळायला लागतात.
तुम्हाला तुमचे केस परत हवे असतील तर, तुमच्या आहारात जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक तत्वांचा समावेश करा.
मेथीचे दाणे प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिडने भरपूर असतात. यामुळे केसांच्या मुळांना बळकटी मिळते आणि रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केस गळती कमी करण्यास मदत करते.
या पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी अॅसिड असतात, जे केसांना मॉइश्चरायझ करतात, आणि मजबूत करतात.
अंडी प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहेत. यामुळे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले अमिनो आम्ल मिळते आणि केसांचीमुळे मजबूत होतात.
नियमित आणि संतुलित आहार घेणे, जे केस गळती रोखण्यात मदत करेल.
याप्रकारचे उपाय करण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमी योग्य ठरेल.