सकाळ डिजिटल टीम
काहींना जेवण करताना कच्चा कांदा खायला आवडतं; पण जास्त प्रमाणात कच्चा कांदा खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
कोणत्याही गोष्टीचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे फायदेशीर आहे, परंतु जास्त प्रमाणात खाल्ल्यास नुकसानीला सामोरे जावे लागते.
जर तुमची साखरेची पातळी सतत कमी होत असेल, तर तुम्ही कच्चा कांदा जास्त प्रमाणात खाणे टाळावे. कांदा जास्त खाल्ल्याने साखरेची पातळी कमी होते.
काहींना कांदा जास्त खाल्ल्याने त्वचेची अॅलर्जी होते. त्वचेशी संबंधित समस्या असल्यास कमीत कमी कांदा खावा.
कच्चा कांदा जास्त खाल्ल्याने श्वासात दुर्गंधी येते. शिवाय, ही श्वासाची दुर्गंधी दीर्घकाळ राहते.
कांदा जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनक्रिया बिघडू शकते. वास्तविक, त्यात उच्च फायबर असते, ज्यामुळे पचनाच्या समस्या वाढतात.