Sandip Kapde
डी-मार्ट ही देशभरात अनेक ठिकाणी उभी राहत आहे.
ग्राहकांना डी-मार्टमध्ये सवलतीच्या दरात वस्तू खरेदी करण्याची संधी मिळते.
एका कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर सांगितले की, "गेले ४ वर्षे मी डी-मार्टसोबत काम करतो आहे.
डी-मार्टची धोरणे स्वस्तात खरीदी करा, स्वस्तात विक्री करा आणि ज्या उत्पादनांची जास्त मागणी असते त्यांना डी होम या नावाने बनवतात.
डी-मार्ट टर्नओव्हर स्ट्रॅटेजीवर काम करते.
वेंडरचे पेमेंट, म्हणजे ज्यांच्याकडून खरेदी करतात त्यांना ७ ते १५ दिवसात पैसे देऊन मोकळे करतात.
मॅन्युफॅक्चरर्स आधीच आर्थिक स्थितीत कमकुवत असतात, त्यामुळे पैसे लवकर मिळण्यासाठी ते ५/१० % नफा ठेऊन डी-मार्टला माल देतात.
स्वस्तात मिळालेला माल जास्त प्रमाणात विकून डी-मार्ट आपला नफा मिळवते.
बिग बाजार आणि रिलायन्सची पेमेंट टर्म ६० ते ९० दिवस आहे. कॅश डिस्काउंटमध्ये ३ ते ४% कट करतात. त्यामुळे सप्लायर्स देखील त्यांना त्याच दराने माल देतात.
अद्याप बिग बाजार आणि रिलायन्सने मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रवेश केलेला नाही.
म्हणून डी-मार्टचे दर सर्वाधिक कमी असतात.
डी-मार्ट ची फ्रँचायझी मिळते का?
डी-मार्टची फ्रँचायझी मिळते का, असा प्रश्न अनेक लोकांना असतो.
डी-मार्ट एजन्सी म्हणजे फ्रँचायझी वगैरे मिळत नाही. जेवढे डी-मार्ट आहेत ते सर्व डी-मार्टच्या मालकीचे आहेत.
मात्र, तुम्ही जमीनीचे मालक म्हणून तुमची जागा भाड्याने देऊ शकता.
तुमचे उत्पादन देखील तुम्ही डी-मार्टमध्ये विकू शकता.
यासाठी तुम्हाला डी-मार्टच्या वेबसाइटवर जाऊन एक फॉर्म भरावा लागतो.
डी-मार्टमधून बाहेर पडताना सेक्युरिटीचे लोक बिलाकडे पाहून ट्रॉलीकडे का पाहतात?