सकाळ डिजिटल टीम
आजकाल कर्करोगाचा प्रसार झपाट्याने होत आहे.
अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे भविष्यात कधीही हा रोग होण्याची शक्यता आहे.
डॉक्टरांच्या मते, कपड्यांमुळेही कॅन्सरचा धोका होऊ शकतो.
अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला पेटीकोट घातल्याने कॅन्सर कसा होऊ शकतो हे सांगणार आहोत.
डॉक्टरांच्या मते, पेटीकोट किंवा परकर घट्ट बांधल्याने त्वचेचा कर्करोग होऊ शकतो.
कंबरेवर सतत दबाव वाढल्याने त्वचेला इजा होऊ शकते.
अशा स्थितीत त्वचेवर जखमा आणि फोडही येऊ शकतात.
अशा जखमा भविष्यात खूप धोकादायक ठरतात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
नाभीच्या खाली पेटीकोट अधिक सैल घातला पाहिजे असे डॉक्टरांचे मत आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.