Aarti Badade
एक्सरसाईज न करताही वजन कमी होईल?
व्यायामासाठी वेळ नसला तरी आहार आणि स्मार्ट लाईफस्टाईलच्या मदतीने वजन नियंत्रणात ठेवता येऊ शकते.
आहाराकडे द्या विशेष लक्ष
वजन वाढण्यामागे चुकीच्या खानपानाच्या सवयी महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे आहारात बदल करणे गरजेचे आहे.
जंक फूडला करा बाय-बाय!
तळलेले, गोड, जास्त कॅलरीचे आणि पॅकबंद पदार्थ कमी केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.
प्लेटमध्ये भाज्यांचे प्रमाण वाढवा
जेवणाच्या प्लेटचा मोठा भाग भाज्यांसाठी ठेवा आणि शक्य असल्यास पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईसचा पर्याय निवडा.
साखर आणि रिफाइंड कार्ब्स कमी करा
पांढरा ब्रेड, बिस्कीट आणि जास्त साखर असलेले पदार्थ कमी केल्याने कॅलरीचे सेवन नियंत्रित ठेवता येते.
पाणी पिण्याची सवय लावा
दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि वजन नियंत्रणाच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते.
झोप आणि हालचालही महत्त्वाची!
दररोज ७-८ तास झोप घ्या, तणाव कमी करा आणि व्यायाम शक्य नसला तरी चालणे किंवा सायकलिंगसारख्या छोट्या हालचालींचा रुटीनमध्ये समावेश करा.