Aarti Badade
10 जुलै 2025 रोजी गुरूपौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी उपवास आणि पूजा करण्याची परंपरा असून गुरूपौर्णिमेला या गोष्टी सुद्धा करणे आवश्यक आहे.
भारतामध्ये गुरूपौर्णिमेला खूप महत्व आहे. गुरूंच्या ज्ञानाने व मार्गदर्शनानेच जीवनातील अंधार दूर होतो, त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात गुरु असणे महत्त्वाचे आहे.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी सकाळी उठून स्नान करून पूजा करावी. वास्तविक, या दिवशी उपवास करण्याची देखील परंपरा आहे
गुरूपौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करुन दिवा लावावा आणि नंतर भगवान विष्णूंचे स्मरण करावे.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुरुंचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा. या दिवशी तुम्ही घरातील वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद देखील घेऊ शकता.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गीतेचे पठण करावे, यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते तसेच मन एकाग्र होण्यास मदत होते.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचं स्मरण करावं, तसेच 'ओम बृहस्पतिये नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
वरिलपद्धतीने गुरूपौर्णिमेला या गोष्टी केल्याने जीवन यशस्वी, सुखकर आणि समृद्ध बनते