सकाळ डिजिटल टीम
26 फेब्रुवारीला महाशिवरात्र येत आहे, तर उपवासासाठी हे पौष्टिक पदार्थ बनवा.
उपवासासाठी पारंपारिक साबुदाण्याची खिचडी बनवावी, जी बटाटा, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची फोडणी घालून तयार केली जाते.
साबुदाण्याचे वडे करून खा; सॉफ्ट आतून आणि क्रिस्पी बाहेरून, जे पचायला हलके असतात.
साबुदाणा न आवडल्यास भगरची इडली ट्राय करा. पचायला हलकी, सोपी आणि वेट लॉससाठी फायदेशीर आहे.
साबुदाण्याचे वडे किंवा फराळी पॅटिस ट्राय करा. मऊ आतून आणि क्रिस्पी बाहेरून, चविष्ट आणि पोटभरेल.
फ्रूट सॅलॅड खा. विविध फळे, सैंधव मीठ आणि पौष्टिक घटक, तसेच वेट लॉससाठी मदत होईल.
साबुदाण्याचे थालीपीठ तयार करा. उकडलेले बटाटे, हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून तयार करा.
भगरची खिचडी शिजवताना कोमट पाणी घाला, जेणेकरून ती सुटसुटीत होईल.
राजगिराची चपाती बनवून ती बटाट्याच्या तिखट भाजीसोबत खा. वजन वाढवणार नाही आणि पचायला हलकी.
गोड काहीतरी खायचं असल्यास, साबुदाण्याची खीर तयार करा. दुधात साखर, ड्रायफ्रुट्स, वेलची आणि केसर मिक्स करून गोडसर खीर तयार करा.