पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे कॅमोमाईल टी, जाणून घ्या ‘हे’ फायदे

Monika Lonkar –Kumbhar

कॅमोमाईल टी

आरोग्यासाठी फायदेशीर असणारा कॅमोमाईल टी हा अनेकांच्या मॉर्निंग रूटीनचा महत्वाचा भाग आहे. या चहाची चव ही सौम्य गोड असते. 

Chamomile Tea Benefits

या कॅमोमाईलला 'कॅमोमाईल फ्लॉवर' असे ही म्हटले जाते. या फुलापासूनच हा चहा बनवला जातो.

Chamomile Tea Benefits

या चहामध्ये अँटी-फंगल, अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इंफ्लेमेंटरी गुणधर्म आढळतात. या खास गुणधर्मांमुळेच हा चहा आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. आज आपण या चहाचे आरोग्याला होणारे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत? ते जाणून घेणार आहोत.

Chamomile Tea Benefits

पचनासाठी फायदेशीर

पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कॅमोमाईल टी चा आहारात समावेश करू शकता. जेवण केल्यानंतर किमान १ तासाने तुम्ही हा कॅमोमाईल चहा पिऊ शकता.

Chamomile Tea Benefits

या चहाचे सेवन केल्याने पचनाच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे, आपल्या शरीराची पचनक्रिया सुरळीत चालते. ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत, अशा लोकांनी कॅमोमाईल टी जरूर प्यावा.

Chamomile Tea Benefits

झोपेच्या समस्येवर प्रभावी

आरोग्य तज्ज्ञ निरोगी राहण्यासाठी दररोज ७-८ तासांची झोप घेण्याची शिफारस करतात. जर तुम्हाला चांगली झोप हवी असेल किंवा झोपेच्या काही समस्या असतील तर कॅमोमाईल टी तुमची मदत करू शकतो.

Chamomile Tea Benefits

सर्दी-खोकल्यापासून मिळतो आराम

जर तुम्हाला सर्दी-खोकल्याची समस्या असेल तर तुमच्यासाठी कॅमोमाईल टी हा सर्वोत्तम पर्याय आहे. हा चहा प्यायल्याने नाक बंद होण्यापासून आणि घशामध्ये होणाऱ्या वेदनांपासून ही तुम्हाला आराम मिळू शकेल. 

Chamomile Tea Benefits

मसक्कलीचा व्हाईट-सिल्वर लूक पाहून पडाल प्रेमात..!

Sonam Kapoor | esakal