Aarti Badade
१८९१ मध्ये त्रिवेंद्रम येथे जन्मलेले चेम्पकरमण पिल्लई टिळकांमुळे प्रेरित होऊन स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय झाले. शिक्षणासाठी ते युरोपला गेले.
१९१५ मध्ये अफगाणिस्तानमध्ये भारताचे पहिले हंगामी सरकार स्थापन झाले. यात पिल्लई परराष्ट्रमंत्री बनले.
जेव्हा हिटलरने भारतीयांबद्दल वंशद्वेषी वक्तव्य केले, तेव्हा पिल्लई यांनी त्याला सडेतोड पत्र लिहिले. हिटलरला माफी मागावी लागली.
चेम्पकरमण पिल्लई यांनीच 'जय हिंद' या राष्ट्रघोषणेची निर्मिती केली! हाच नारा पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वीकारला.
नेताजींनी 'जय हिंद'ला आझाद हिंद सेनेचा अधिकृत नारा बनवले. स्वातंत्र्यानंतरही भारतीय लष्कर अभिमानाने ही घोषणा देतात.
भारतापासून दूर असतानाही चेम्पकरमण पिल्लई यांनी ब्रिटिशांविरुद्ध युरोपमध्ये जोरदार संघर्ष केला.
हिटलरच्या रोषामुळे जर्मनीतील त्यांचे घर सरकारने जप्त केले. त्यानंतर ते इटलीला गेले, पण तिथे विषबाधेने त्यांचा मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी त्यांनी पत्नी लक्ष्मीला वचन दिले – "माझी अस्थी केरळमध्ये विसर्जित करा." स्वातंत्र्यानंतर हे वचन पूर्ण झाले.