Payal Naik
व्यक्तीला नवीन शिकण्यासाठी वयाची मर्यादा नसते व्यक्ती जेव्हा इच्छा होईल तेव्हा काही ना काही शिकू शकतो.
चाणक्य यांच्या मते आपण पशु आणि प्राण्यांकडून भरपूर गोष्टी शिकू शकतो. माणसाने कुत्र्यापासून काय शिकायला पाहिजे हे देखील चाणक्य नितीमध्ये सांगितलं आहे.
कुत्रा कितीही भुकेला असला तरी त्याला जेवढे मिळेल त्यातच तो समाधान करून घेतो. आचार्य चाणक्य सांगतात, व्यक्तीने नेहमी जेवणाच्या मागे धावू नये. जेवढे जेवण मिळते तेवढ्यात समाधानी राहावे.
जवळ जी गोष्ट आहे, ती प्रेमाने खावी. कधीही अति अपेक्षा करू नये. कारण यामुळे तुम्हाला दु:ख मिळू शकते.
कुत्र्याला गाढ झोप लागते पण गाढ झोपेत असतानासुद्धा थोड्याशा आवाजाने तो जागा होतो.
चाणक्य सांगतात, जर तुम्ही गाढ झोपेत असाल तरी व्यक्तीने सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच मनुष्याची सुद्धा कुत्र्याप्रमाणे झोप असावी ज्यामुळे गरज पडल्यावर सतर्क राहता येईल.
कुत्रा मालकाशी कायम प्रामाणिक राहतो. आचार्य चाणक्यनुसार, व्यक्तीने कुत्र्याप्रमाणे मालकाशी प्रामाणिक राहावे.
मनुष्य सुद्धा ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्याशी प्रामाणिक राहावे. नोकरी असो किंवा एखाद्या संस्थेप्रती प्रामाणिक राहावे. कारण यामुळे हे लोक आपले लक्ष्य प्राप्त करून आनंदी जीवन जगू शकतात
कुत्र्यापासून धाडसीपणा शिकायला पाहिजे. एक धाडसी प्राणी नेहमी मालकाला सुरक्षित ठेवतो आणि मालकासाठी जीव सुद्धा गमावण्यास मागे पुढे पाहत नाही.
तसेच व्यक्तीने न घाबरता धाडसी असायला पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास तयार पाहिजे.
Sunita Williams यांनी अंतराळात केस का बांधले नाहीत? हे आहे कारण