Shubham Banubakode
चाणक्य म्हणतात, प्रत्येक स्त्री जोडीदाराकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा करते. जर पुरुषात हा गुण असेल, तर स्त्री त्याच्याकडे आकर्षित होतात.
जो पुरुष आपल्या जोडीदाराच्या बोलण्याकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, अशा पुरुषांकडे स्त्रिया आकर्षित होतात.
चाणक्य यांच्या मते, जो पुरुष नेहमी खरे बोलतो, त्याच्यावर स्त्रीचा विश्वास वाढतो आणि त्यांचे नाते दृढ होते.
स्त्रियांना जोडीदाराकडून आदराची अपेक्षा असते. जो पुरुष आपल्या स्त्रीच्या विचारांचा आदर करतो, तो तिच्या हृदयात विशेष स्थान मिळवतो.
चाणक्य नीतीनुसार, स्त्रियांना असा जोडीदार हवा असतो, जो विश्वासार्ह असेल. अशा पुरुषावर त्या कठीण प्रसंगीही अवलंबून राहू शकतात.
स्त्रियांना आपल्या जोडीदाराकडून भावनिक आधाराची अपेक्षा असते. जो पुरुष आपल्या जोडीदाराच्या भावनांना समजून घेतो, तो तिच्या जवळचा ठरतो.
चाणक्य यांच्या मते, जो पुरुष आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतो आणि त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होतो, तो स्त्रीच्या मनात आदर मिळवतो.
चाणक्य सांगतात की, संयम राखणारा पुरुष आपल्या जोडीदाराच्या मनात विशेष स्थान निर्माण करतो. त्यामुळे दोघांची नाते अधिक दृढ होते.
चाणक्य यांच्या मते, प्रेम आणि आपुलकी दाखवणारा पुरुष स्त्रियांच्या हृदयात कायम स्थान मिळवतो.
चाणक्य नीतीनुसार, बुद्धिमान आणि परिपक्व विचारांचा पुरुष स्त्रियांना नेहमीच प्रभावित करतो.