Aarti Badade
आचार्य चाणक्य म्हणतात की, जगात असे ५ शक्तिशाली आणि धोकेबाज लोक असतात ज्यांच्याशी घेतलेला पंगा तुमचे सुख, शांतता आणि यश एका झटक्यात राख करू शकतो.
Chanakya niti enemy management rules
Sakal
तुमचे यश पाहून वरवर हसणारे पण पाठीमागून बदनामी करणारे जळणारे लोक तुमच्या आजूबाजूलाच असतात; यांच्याशी उघड शत्रूत्व घेतल्यास हे तुमच्याविरुद्ध गुप्तपणे कट रचतात.
Chanakya niti enemy management rules
Sakal
तुमच्या प्रत्येक कमकुवत बाजूची पूर्ण कल्पना असलेला आणि घरात किंवा जवळचा वाटणारा हा छुपा शत्रू वरून प्रेम दाखवून मनात मात्र तुमच्या विनाशाची इच्छा बाळगतो.
Chanakya niti enemy management rules
Sakal
कधीही, कुठेही आणि काहीही बोलणाऱ्या व्यक्तीशी शत्रूत्व घेतल्यास, ती समाजात किंवा लोकांसमोर तुमची वर्षानुवर्षांची प्रतिष्ठा धुळीस मिळवायला एक सेकंदही लावणार नाही.
Chanakya niti enemy management rules
Sakal
वरवर स्तुतीची चटक लावून तुम्हाला आतून कमजोर करणारे हे चमचे लोक छुपे शत्रू असतात, जे वेळ आल्यावर तुमच्या सर्व कमकुवतपणाचा सर्वात आधी गैरफायदा घेतात.
Chanakya niti enemy management rules
Sakal
पैसा, ताकद आणि संसाधने असलेल्या बॉस, सरकारी अधिकारी किंवा नेत्याशी घेतलेला पंगा कायदेशीर किंवा सामाजिकदृष्ट्या तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो.
Chanakya niti enemy management rules
Sakal
चाणक्यांनुसार, खरा शत्रू बाहेर नाही तर तो तुमच्या स्वतःच्या आत लपलेला आहे; ज्याला जिंकल्यास बाहेरील कोणताही शक्तिशाली शत्रू तुमचे काहीही वाकडे करू शकत नाही.
Chanakya niti enemy management rules
Sakal
बाहेरील धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी माणसाने आपल्या मनातील क्रोध (राग), अहंकार (घमेंड), लोभ (लालसा) आणि भय (भीती) या ४ दुर्गुणांवर ताबा मिळवणे आवश्यक आहे.
Chanakya niti enemy management rules
Sakal
Gaganbawada Hill Station Kolhapur
Sakal