Aarti Badade
गुरुपौर्णिमा ही गुरुशिष्य परंपरेचा सन्मान करणारी पवित्र तिथी आहे. या दिवशी गुरूंचे पूजन केल्याने ज्ञान, कृपा आणि आत्मिक उन्नती मिळते.
गुरुपौर्णिमेला गुरुंना समक्ष भेटणे शक्य नसले तरी त्यांची मनोमन पूजन करणे आणि काही मंत्रजप उपयुक्त ठरते.
गुरु समोर नतमस्तक होण्याचा हा दिवस असतो.
गुरुंना शरण गेले की सर्वदोष निवारण होते. त्यासाठी या मंत्रांचा गुरुपौर्णिमेला जप करावा.
गुरुपौर्णिमेला गुरुपूजन केल्याने गुरुंच्या आशीर्वादाने जीवनातील अडथळे दूर होतात व मनःशांती प्राप्त होते.
हा मूलमंत्र गुरुच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. मन, वाणी आणि कर्म शुद्ध होतात.
गं बीज मंत्राच्या उच्चाराने ज्ञानाचे द्वार खुलते. बुद्धी आणि विवेक वाढतो.
या मंत्रांद्वारे परमतत्त्वातील गुरुंचे ध्यान केले जाते. ही उपासना आत्मिक उन्नतीसाठी प्रभावी असते.
हा सर्वश्रेष्ट गुरुस्तोत्र आहे. गुरु हेच ब्रह्म, विष्णू आणि महेश समजले जातात. या स्तोत्राचा जप केल्याने सर्वदोषांचे निवारण होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.