दिनेश कार्तिकच्या बॅटची किंमत पाहून व्हाल चकित

सकाळ डिजिटल टीम

आयपीएल २०२४ मध्ये राॅयल चॅलेंजर्स बॅंगलोरचे प्रदर्शन अत्यंत खराब राहिले आहे. आरसीबीने ७ पैकी ६ सामने हारले आहेत.

dinesh karthik | sakal

अशातच संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक चमकदार कामगिरी करत गोलंदाजांची धुलाई करत आहे

dinesh karthik | sakal

४० वर्षीय दिनेश कार्तिकची ही शेवटची आयपीएल आहे असे बोलले जात आहे. त्याने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात ३५ चेंडूत ८३ धावा करत सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा वेधले आहे.

dinesh karthik | sakal

त्याने ज्या बॅटने ही कमाल दाखवली त्याची खासियत आणि किंमत ऐकूण चकित व्हाल.

dinesh karthik | sakal

दिनेश कार्तिक मेरठची नामांकित कंपनी एसएसची बॅट आणि इतर किट वापरतो.

dinesh karthik | sakal

कार्तिकने स्वत: एका व्हिडीओत सांगितले की, तो गेल्या १५ वर्षांपासून या कंपनीची बॅट वापरत आहे आणि नेहमी याच बॅटने बॅटींग करणार.

dinesh karthik | sakal

या बॅटची खासियत सांगताना कार्तिक म्हणाला या बॅटचा विलो जबरदस्त आहे आणि याला बाॅल लागल्यावर जो बाऊंस मिळतो तो उत्कृष्ट आहे.

dinesh karthik | sakal

दिनेश कार्तिकच्या या बॅटची किंमत फक्त ३६ हजार आहे आणि डिस्काऊंटमध्ये ती ३० हजारांना मिळते.

dinesh karthik | sakal

याच बॅटने दिनेश कार्तिकने आयपीएल २०२४ मध्ये ७ सामन्यांत २२६ धावा केल्या आहेत.

dinesh karthik | sakal

कोण आहे रिचर्ड ग्लीसन ?

richard gleseen | sakal