मोहिमेवर जाताना चंगेझ खान अळ्यांनी भरलेली गाडी का न्यायचा?

संतोष कानडे

चंगेझ खान

चंगेझ खान मोहिमेवर जाताना अळ्यांनी भरलेली गाडी घेऊन जायचा. हे वाचून आश्चर्य वाटेल. परंतु सत्य आहे.

अळ्या

अळ्यांना "मॅगॉट्स" असं म्हणतात. त्या सडलेल्या किंवा मृत मांसावर आपलं अन्न शोधतात. सैनिकांच्या जखमा या अळ्यांमुळे बऱ्या व्हायच्या.

जखमा साफ करणाऱ्या अळ्या

या अळ्या फक्त सडलेलं आणि संसर्गित मांस खायच्या. त्यामुळे जखमा स्वच्छ व्हायच्या आणि भरुन निघायच्या.

औषध

मंगोल सैन्याप्रमाणेच ऑस्ट्रेलियातील नगियमपास जमात, म्यानमार आणि माया संस्कृतीतही अळ्यांचा औषधोपचारासाठी वापर केला जात होता.

अमेरिकन गृहयुद्ध

अमेरिकेतील गृहयुद्धात शल्यचिकित्सक जॉन फोर्नी यांनी युद्धकाळात जखमा स्वच्छ करण्यासाठी अळ्यांचा वापर सुरू केला होता.

औषधी शक्ती

या अळ्या जखमेतील जीवाणूंनाही नष्ट करतात. त्यामुळे त्यांचा वापर केल्याने संक्रमण होण्याचा धोका कमी होतो.

विज्ञानाने अळ्यांना झिडकारलं

पेनिसिलिन आणि स्वच्छता विज्ञान आल्यावर अळ्यांचा वापर मागे पडला. पण एक जीवाणूने पुन्हा त्यांचं महत्त्व वाढवलं होतं.

MRSA विरुद्ध अळ्यांचा प्रभाव

1980 च्या दशकात MRSA सारख्या जीवाणूंवर औषधं निष्क्रिय झाली तेव्हा अळ्यांनी या जीवाणूंना संपवलं होतं.

NHS

ब्रिटनमध्ये NHS (राष्ट्रीय आरोग्य सेवा) अळ्यांचा वैद्यकीय वापर करते. यासाठी "टी-बॅग" पद्धतीने अळ्यांचा वापर केला जातो.

जीव

अळ्या केवळ कीटक नाहीत, तर औषधी महत्त्व असलेले जीव आहेत. इतिहास, जैवविज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्र त्यांचा वापर करत आहेत.