Saisimran Ghashi
क्रूर शासक औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या केली होती.
छत्रपती संभाजी महाराजांसोबतच त्याने कवि कलश यांचीदेखील हत्या केली.
छावा चित्रपटात दाखल्याप्रमाणे स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या शंभूराजांचा मृत्यू हा हृदयद्रावक आहे.
पण संभाजी महाराजांनी मृत्यूआधी काय म्हटले असतील तुम्हाला माहिती आहे काय?
छत्रपती संभाजी महाराज बलिदानापूर्वी म्हणाले, आबासाहेब तुम्ही आभाळाच्या डोळ्यातून पाहत असाल मला पण तुमचं आभाळाएवढं रूप पाहण्यासाठी मला डोळेच राहिले नाहीत ओ!
आग्ऱ्यातून निघताना तुमचा हात विश्वासाने हातात घेऊन म्हणालो होतो आमची फिकीर करू नका आबा साहेब आम्ही सुखरूप गडावरती पोहोचू.
तसाच तुम्ही माझा हात विश्वासाने हातात घ्याल का आबासाहेब? पण ते हातही उरले नाहीत. तुम्हाला आबासाहेब अशी साद घालायला जीभही नाही
पण एक सांगतो आबासाहेब रक्ताचा अभिषेक घालून जर स्वराज्याचं मंदिर पवित्र होणार असेल तर आणि शिवपुत्र म्हणून माझी मृत्यूशी ओळख होणार असेल तर मी रायगडाच्या जगदेश्वराला असं मागणं मागेन की हजारो वेळा जन्म दे पण शिवपुत्र म्हणूनच दे
जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलं आणि स्वराज्यासाठी मरायचं कसं हे मी जगाला शिकवेन. औरंगजेबाने महाराजांना शेवटी बोलण्याची संधी दिली नव्हती पण महाराज मनाच्या आकांतातून नक्कीच हे बोलले असतील.