Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभुराजे यांचा इतिहास तर आपण जाणतोच
पण हा इतिहास जगासमोर मांडून छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोणती शोधली होती तुम्हाला माहिती आहे का?
ही व्यक्ती दुसरी तिसरी कोण नसून महाराष्ट्राचीच होती. त्यांचे नाव आहे बहुव्यासंगी संशोधक वा.सी बेंद्रे
वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी शिवरायांचे अस्सल चित्र आणि संभाजीराजांचा खरा इतिहास संशोधनाद्वारे जगासमोर मांडून इतिहासाला नवा दृष्टिकोन दिला.
१९२८ साली ‘साधन चिकित्सा’ हा ग्रंथ प्रकाशित करून बेंद्रेंनी शिवकालीन इतिहास संशोधनाची खरी सुरुवात केली
जिथे नाटकांमधून शंभूराजांची चुकीची प्रतिमा उभी केली जात होती, तिथे ४० वर्षे अथक परिश्रम घेऊन त्यांनी ६५० पानांचा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला.
वढू बुंदरुक येथे असलेली छत्रपती संभाजी महाराजांची समाधी संशोधनाच्या माध्यमातून प्रथमच जगासमोर आणली.
शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, शहाजीराजे, मालोजीराजे यांचे चरित्र, शिवराज्याभिषेक, संत तुकाराम यांच्या अभंगांचे संकलन असे ६० पेक्षा अधिक ग्रंथ त्यांनी लिहिले.