छत्रपती संभाजी महाराजांनी नृत्यकलेवर लिहिला होता ग्रंथ

संतोष कानडे

छावा सिनेमा वाद

संभाजी महाराजांवर सध्या छावा हा सिनेमा येतोय ज्यात छत्रपतींनी केलेल्या लेझिम या नृत्यावरून वाद सुरू आहे.

sambhaji maharaj | esakal

संभाजी महाराज नृत्य

संभाजी महाराज महापराक्रमी होतेच शिवाय त्यांना अनेक भाषादेखील अवगत होत्या. इतिहास, काव्यशास्त्रासोबत त्यांचे संगीताचेही शिक्षण झाले होते.

sambhaji maharaj | esakal

संभाजी महाराज ग्रंथ

संभाजी महाराजांनी ‘बुधभूषण’, ‘नायिकाभेद’, ‘नखशिखा’ आणि ‘सातसतक’ या ग्रंथांचे लिखाण केले.

बुधभूषण

या संस्कृत ग्रंथाची निर्मिती शंभूराजांनी वयाच्या केवळ १४व्या वर्षी केली. यात शिवरायांच्या पराक्रमाचे वर्णन केलेले आहे.

नायिकाभेद

हा संभाजी महाराजांनी लिहिलेला दूसरा ग्रंथ. याची रचना ब्रज भाषेत केलेली आहे.

नृपशंभू

नायिकाभेद हा ग्रंथ संभाजी महाराजांनी स्वत:च्या राज्याभिषेकानंतर लिहिलेला असावा कारण यात त्यांनी स्वतःचा उल्लेख नृपशंभू असा केलेला आहे.

सौंदर्य आणि लोकनृत्य

या ग्रंथात संभाजी महाराजांनी शिवकुळातील स्त्रिया महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध नृत्य सादर करत असत, या नृत्य करणार्‍या नायिकांचे भेद ग्रंथात सांगितले आहेत.

छावा

छावा सिनेमामध्ये संभाजी महाराज नृत्य करताना दाखवलं होतं, आता वादानंतर तो सीन डिलिट करण्यात येणार आहे.