संतोष कानडे
छत्रपतींनी शत्रूच्या मुलाला राजपुत्रासारखं वाढवून त्याला आपलं भोसले आडनाव दिलं होतं.
हाच मुलगा पुढे अक्कलकोट संस्थानचा संस्थापक झाला आणि रायगड मुक्त करण्यास मोठी कामगिरी बजावली.
थोरले शाहू महाराजांची जेव्हा औरंगजेबाच्या छावणीतून सुटका झाली तेव्हा ते दक्षिणेत आले.
'महाराष्ट्राचा खरा राजा मीच असून माझ्या भेटीस येऊन स्वामीनिष्ठा व्यक्त करा' असं आज्ञापत्र शाहू महाराजांनी काढलं.
अहमदनगरहून साताऱ्याच्या दिशने येत असताना वाटेमध्ये पारद गावच्या पाटलाने त्यांना अडथळा आणला.
तेथे त्यांची चकमक उडाली. त्यात पाटील गारद झाला. तेव्हा पाटलाच्या बायकोने आपल्या लहान मुलास शाहू महाराजांच्या पायावर ठेवले.
मुलाला अभय द्यावे आणि त्याचा सांभाळ करावा, अशी विनवणी पाटलाच्या बायकोने केली.
शाहू राजांनी पहिली फत्ते झाली म्हणून त्याचे नाव फत्तेसिंग असे ठेवले आणि त्याला राजपुत्रासारखे वाढवले.
हेच फत्तेसिंग भोसले पुढे अक्कलकोट संस्थानचे संस्थापक झाले. रायगड पुन्हा स्वराज्यात मिळवण्याकामी फत्तेसिंग यांचं मोठं योगदान होतं.
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या 'महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग-२' या पुस्तकामध्ये हा इतिहास देण्यात आलेला आहे.