संतोष कानडे
औरंगजेबाच्या कबरीवरुन सध्या वाद-विवाद सुरु झालेला आहे. छत्रपती संभाजी नगर येथील खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे.
औरंगजेबाच्या मृत्यूपत्रातील इच्छेमुळे कबर अत्यंत साधी बनवण्यात आलेली आहे. कबरीला छतदेखील नाही.
छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करुन मारलेल्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको, अशी भूमिका काही लोक घेत आहेत.
सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या नेत्यांनी अशी भूमिका घेतलेली आहे. ही कबर उखडून टाकावी, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनीही केली होती.
मात्र याच औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन छत्रपती संभाजीराजेंचे पुत्र थोरले शाहू छत्रपती यांनी प्रणाम केला होता, असा ऐतिहासिक उल्लेख आहे.
महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या 'महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग-२' या पुस्तकामध्ये असा दाखला देण्यात आलेला आहे.
पुस्तकामध्ये म्हटलंय की, औरंगजेबाच्या छावणीतून सुटका झाल्यानंतर शाहू महाराजांनी अहमदनगरमार्गे दक्षिणेत प्रवेश केला.
खुलताबाद येथे जाऊन त्यांनी औरंगजेबाच्या कबरस्थानास प्रणाम केला,असा या पुस्तकात उल्लेख आहे.
'मुन्तखाब उल लुबाब' या खाफी खान याच्या दैनंदिनीमधून कबरीचा संदर्भ इतिहासकारांनी घेतलेला आहे.
मात्र खाफी खानाने 'काही लोकांच्या सांगण्यावरुन' असा उल्लेख त्याच्या डायरीमध्ये केलेला आहे. त्यामुळे ही ऐकीव माहिती असल्याची शंका येते.