संतोष कानडे
शिवाजी महाराज केवळ पराक्रमी योद्धा नव्हते, तर बहुभाषिक, बुद्धिमान शासकही होते.
१६४० मध्ये शिवाजी महाराज वयाच्या १०व्या वर्षी शहाजीराजांकडे बंगळूरला गेले.
शिवरायांनी वडिलांचा दरबार, राज्यकारभार, युद्धशास्त्र व नेतृत्वकौशल्य यांचे शिक्षण घेतले.
शहाजीराजांच्या दरबारात असलेल्या पंडितांकडून शिवरायांना संस्कृत, रामायण-महाभारत यांचे सखोल ज्ञान मिळाले.
संस्कृत भाषेवर शिवाजी महाराजांचे प्रभुत्व होते. याचे उदाहरण म्हणजे संस्कृतमधील ‘राजमुद्रा’ व 'राज्यव्यवहार कोश'.
मुघल आणि आदिलशाही सत्तांशी व्यवहार करताना शिवरायांनी फारसी भाषेचा सखोल अभ्यास केला होता.
बंगळूरुमध्ये वास्तव्य केल्यामुळे शिवाजी महाराजांना स्थानिक कानडी भाषा अवगत झाली होती.
मराठी ही मातृभाषा असल्याने सर्व निर्णय, पत्रव्यवहार, प्रशासन मराठीतून व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
शिवभारतात म्हटले आहे की शिवरायांनी लहान वयातच मुळाक्षरे आत्मसात केली व शिक्षणात प्राविण्य मिळवले.
संस्कृत, मराठी, फारसी, कानडी या भाषांचे ज्ञान असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे खर्या अर्थाने बहुभाषिक आणि विद्वान शासक होते!