Vrushal Karmarkar
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. या काळात त्यांचे अनेक शत्रू होऊन गेले. मात्र तुम्हाला माहिती आहे का? शिवरायांचा पहिला शत्रू एक महाराष्ट्रीयन माणूस होता.
शिवचरित्रचे अभ्यासक अजित मोघे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या शत्रूबद्दल माहिती दिली आहे. एका मुलाखतीत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला शत्रू हा मराठी माणूस होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या स्वराज्यात सत्य, न्याय, नीती आणि स्त्रियांची अब्रू या चार चतुर्स्म्रुतीवर उभारलेली एक राज्यव्यवस्था आणायची होती.
पण त्यांच्या गावातील एका पाटलाने गावातील एका मुलीवर अत्याचार केला होता. तेव्हा शिवरायांना ठरवलं त्यांना जी व्यवस्था आणायची आहे, त्याच्या आड येणारा प्रत्येक माणूस त्यांचा शत्रू आहे.
बाबाजी भिकाजी गुजर पाटील असं त्या माणसाचं नाव होतं. तो गावचा सरपंच होता. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुण्याला बोलावलं होतं.
यावर पाटील म्हणाला- कोण राजा! कोणी केलं त्याला राजा, मी या गावचा पाटील आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं पाठवून त्याला उचलून आणण्याचे आदेश दिले.
पाटील गडावर जाताच शिवरायांनी एक हुकूम दिला. त्यांनी आदेश दिला की, त्याचे दोन हात, दोन पाय कोपऱ्यापासून तोडून टाका. यानंतर त्याचे हात पाय तोडण्यात आले.
यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अजून एक महत्त्वाचा हुकूम दिला. तो फार महत्वाचा होता. महाराज म्हणाले की, तो पाटील मेला तर उपयोग नाही. त्याच्यावर औषधोपचार करा.
औषधोपचार करुन पाटील बरा झाला. तेव्हा महाराजांनी पुन्हा आज्ञा केली की, या पाटलाला रोज सकाळी उचलून चावडीवरती आणायचं. तसेच संध्याकाळ झाली की त्याला परत घरी नेऊन सोडायचं.
स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या माणसाला काय शिक्षा होते हे रोज लोकांना दिसलं पाहिजे. हा त्यामागचा हेतू होता. यामुळे शिवरायांनी हा निर्णय घेतला होता. तेव्हापासून तो पाटील शिवरायांचा पहिला शत्रू मानला जातो.