Pranali Kodre
छत्रपती शिवाजी महाराजांनी थेट लढाईऐवजी शत्रूवर अचानक हल्ला करून त्यांना हादरवण्याची रणनीती वापरली — यालाच ‘गनिमी कावा’ म्हणतात.
गनिमी काव्यामुळे महाराज अल्प सैन्यानेही बलाढ्य शत्रूंना पराभूत करायचे. हेच तंत्र सध्याच्या काळातही वापरता येऊ शकते!
पाकिस्तानच्या आतंकवादी तळांवर अचानक, अत्यंत गुप्त कारवाया करून त्यांना थक्क करता येईल.
महाराजांच्या मावळ्यांसारखं सध्याची NIA, MARCOS, Para SF फोर्सेस गुप्त धडक कारवाया करू शकतात.
शिवाजी महाराजांनी जसे दुर्गम वाटा वापरल्या, तसेच हायटेक साधनांचा वापर करून गुप्त मिशन्स करता येतील.
गनिमी काव्याचा भाग म्हणजे खोट्या हालचाली दाखवून शत्रूला गोंधळवणे. आधुनिक ड्रोन आणि सायबर हल्ल्यांनी हे शक्य आहे.
जसा महाराजांनी स्थानिकांचा आधार घेतला, तसंच सीमावर्ती भागात माहिती मिळवण्यासाठी स्थानिक लोकांचा विश्वास संपादन करता येईल.
गनिमी काव्याचा सर्वात मोठा परिणाम — शत्रूला कायम अनिश्चिततेत ठेवणे. सतत बदलते धोरण यासाठी प्रभावी ठरू शकते.
मोठ्या युद्धाऐवजी छोटे, जलद आणि परिणामकारक ऑपरेशन्स यशस्वी ठरू शकतात — शिवरायांनीही हेच दाखवून दिलं.
शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आजही तितकाच प्रभावी आहे.फक्त आधुनिक साधनांचा वापर करून त्याला नव्या उंचीवर नेण्याची गरज आहे!