Pranali Kodre
इ.स. १६७१ च्या धुळवडीच्या दिवशी, दांडा येथे शिद्दी खैर्यतखान व याकूद खानने शिवाजी महाराजांच्या आरमारावर अचानक हल्ला चढवला.
मराठा सैन्य शिमग्याच्या उत्सवात गुंतलेले असताना, शिद्दीने संधी साधली आणि रात्रीच्याच वेळी जोरदार आक्रमण केले.
शिद्दीने मराठ्यांच्या दारूखान्यावर हल्ला केला, ज्यामुळे भीषण स्फोट झाला. त्याचा आवाज थेट रायगडावर झोपलेल्या महाराजांपर्यंत पोहोचला.
स्फोटाच्या आवाजाने शिवाजी महाराज दचकून जागे झाले. ‘राजपुरीस काहीतरी गडबड आहे’ असे त्यांना वाटले.
शिद्दीने दांडा व आजूबाजूची ठाणी जिंकली. मुंबईकर इंग्रजांनी लिहिलं – 'शिवाजीची ठाणी शिद्दीने आमच्या डोळ्यांदेखत जाळली.'
या लढाईत मराठ्यांचा मोठा पराभव झाला. दाभोळहून आलेल्या आरमारानेही कुठलीच तयारी केली नव्हती.
या पराभवाचा वचपा घेण्याचा निर्धार शिवाजी महाराजांनी केला. आरमार पुन्हा बांधले गेले आणि तयारी सुरू झाली.
इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी नव्याने आरमार उभं केलं आणि रायगडहून मोठी फौज शिद्दीवर एकदम धाडली.
शिवाजी महाराजांच्या सैन्याने शिद्दीच्या शेकडो सैनिकांचा संहार केला. दांडा पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला.
या यशस्वी कारवाईनंतर गोव्यापासून जंजिऱ्यापर्यंतचा सागरी किनारा मराठ्यांच्या नियंत्रणात आला.