Pranali Kodre
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याला आता ३५० वर्षे होऊन गेली आहेत. पण आजही मोठ्या उत्साहात श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळा दरवर्षी रायगडावर पार पडतो.
६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता.
हा सोहळा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी त्याकाळी दूरदूरहून लोक आले होते.
शिवरायांच्या राज्यकारभारात अष्टप्रधानांचा मोठा वाटा होता, त्यामुळे त्यांना राज्याभिषेक सोहळ्यातही मोठा मान देण्यात आला होता.
शिवरायांचा अष्टप्रधान राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या दोन्ही बाजूना होता.
शांताराम विष्णु आवळसकर लिखित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून प्रकाशिक करण्यात आलेल्या रायगडाची जीवनकथा या पुस्तकात याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
यातील माहितीनुसार सिंहासनाच्या डाव्या बाजूला सेनापती हंबीरराव मोहिते सरनोबत, डबीर सुमंत राचंद्र त्रिंबक, न्यायाधीश रावजी निराजी आणि रघुनाथराव पंडितराव हे होते.
तसेच सिंहासनाच्या उजव्या बाजूला मुख्यप्रधान (पेशवा) मोरोपंत पिंगळे, मुजुमदार अमात्य रामचंद नीलकंठ, सुरनिस सचिव अण्णाजी दत्तो, वाकनीस-मंत्री दत्ताजी त्रिंबक हे होते.
दरम्यान, काही कागदपत्रांनुसार अशीही नोंद आढळते की या भव्य राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशातील विविध भागांमधून सुमारे ११ हजार लोक रायगडावर उपस्थित होते.