आशुतोष मसगौंडे
छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण आठ मुले होती, यामध्ये दोन मुले आणि सहा मुलींचा समावेश.
छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराज, राजाराम महाराज असे दोन पुत्र होते. पुढे संभाजी महाराज आणि राजाराम महाराज मराठा साम्राज्याचे राजे बनले.
सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर अशी शिवाजी महाराजांच्या राजकन्यांची नावे होती.
शिवाजी महाराजांच्या राजकन्यांचा विवाह मराठा साम्राज्यातील पराक्रमी कुटुंबात झाला होता.
शिवरायांना आठ पत्नी होत्या. त्यापैकी सईबाई यांना तीन, सोयराबाई यांना एक आणि सगुणाबाई यांना दोन कन्या होत्या.
सखवारबाई उर्फ सखुबाई, राणूबाई, अनामिका उर्फ अंबिकाबाई या सईबाई यांच्या मुली तर दीपाबाई या सोयराबाई यांच्या कन्या होत्या. राजकुंवरबाई आणि कमलाबाई या सगुणाबाई यांच्या मुली होत्या.
शिवरायांना सईबाई यांच्यापासून संभाजी महाराज यांची पुत्रप्राप्ती झाली.
सोयराबाई यांच्या पोटी राजाराम महाराज यांचा जन्म झाला होता.
सखुबाई या शिवरायांच्या ज्येष्ठ कन्या होत्या त्यामुळे त्या महाराजांच्या सर्वात लाडक्या होत्या.