सकाळ डिजिटल टीम
छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज, उदयनराजे भोसले हे साताऱ्यातच नाही तर राज्यात लोकप्रिय आहेत.
बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यासाठी उदयनराजे ओळखले जातात.
सर्वसामान्यांत लिलया मिसळण्याची, त्यांना आपलं करण्याची त्यांची हतोटी अनेकांना भावते.
भावनिक स्वभावामुळे ते लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
कॉलर उडविण्याच्या त्यांच्या स्टाईलवर तरुणाई एकदम फिदा आहे.
सर्वसामान्यांना ते आपले वाटतात, हीच उदयनराजेंची मोठी जमेची बाजू आहे.
राजेशाही कुटुंबातील असले तरी उदयनराजेंची राजकीय कारकीर्द नगरसेवकापासून सुरु झाली.
त्यानंतर एक एक पायरी चढत उदयनराजेंनी आता खासदारकीचा मोठा पल्ला गाठला आहे.