Amit Ujagare (अमित उजागरे)
तमाशा म्हणजे केवळ करमणूक नाही, तर भक्ती, शृंगार आणि जनजागृती यांचा संगम आहे.
"लौकर यावे सिद्ध गणेशा, आतमध्ये कीर्तन वरून तमाशा" – पठ्ठे बापूराव यांच्या या ओळी तमाशाचा उगम भक्ती आणि शृंगार यांच्या एकत्रित प्रभावातून झाल्याचं सांगतात.
तात्या सावळजकर, दगडू तांबे, भाऊ बापू यांसारख्या कलाकारांनी तमाशाला वेगळ्या उंचीवर नेले आणि तो तमाशाचा सुवर्णकाळ (१८८० – १९३०) ठरला.
द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी अश्लीलतेच्या आरोपावरून १९४८ मध्ये तमाशावर बंदी घातली.
या निर्णयाला लोकांचा आणि तमाशा कलावंतांचा जोरादार विरोध झाला. त्यामुळे सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.
तमाशात सुधारणा घडवून आणण्यासाठी १९४८ साली एक समिती स्थापन झाली. यामध्ये अश्लील पदे, स्पर्श निषिद्ध ठरवण्यात आले.
तमाशाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि सामाजिक भान जपणारा तमाशा म्हणून त्याची ओळख निर्माण करण्यासाठी १९५५ मध्ये महाराष्ट्र तमाशा परिषदेची स्थापना झाली.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 'तमाशा' नव्हे, तर 'लोकनाट्य' हे जनतेचं हत्यार बनलं, ज्यात अण्णाभाऊ साठेंनी मोठी भूमिका बजावली.
तमाशावर बंदी असूनही अण्णाभाऊंनी त्याचं निर्भीड सादरीकरण केलं. "हा तमाशा नव्हे, लोकनाट्य आहे" असं सांगत त्यांनी जनतेला जागृत केले.
आज तमाशा म्हणजे लोकजागर, जनशिक्षण आणि सामाजिक जाणिवेचा मंच बनला आहे, परंपरेपासून परिवर्तनाकडे वाटचाल करत.