T20 Cricket : टी 20 क्रिकेटमध्ये एकाच षटकात 4 विकेट्स घेणारे गोलंदाज

अनिरुद्ध संकपाळ

टी 20 वर्ल्डकप 2024 च्या सुपर 8 मध्ये इंग्लंड आणि युएसए यांच्यातील सामन्यात एक मोठा विक्रम झाला.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने हॅट्ट्रिक घेतली. त्याने आपल्या तिसऱ्या षटकात या विकेट्स घेतल्या.

विशेष म्हणजे याच षटकात जॉर्डनने अजून एक विकेट घेतली. या विकेटमुळे तो टी 20 वर्ल्डकपमध्ये एकाच षटकात चार विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला.

यापूर्वी कर्टिस कॅम्फरने देखील एकाच षटकात 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं हा कारनामा 2021 मध्ये नेदरलँड्सविरूद्ध केला होता.

ख्रिस जॉर्डन जरी इंग्लंडकडून खेळत असला तरी तो बारबाडोसचा आहे. त्याचा जन्म बारबाडोसचा असून इथेच त्याने हॅट्ट्रिक घेतली.

टी 20 वर्ल्डकपमधील ही नववी हॅट्ट्रिक असून जॉर्डन हा टी 20 वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्रिक घेणारा आठवा गोलंदाज ठरला.

T20 World Cup : टी 20 वर्ल्डकपमधील सर्वात महागडी 5 षटके

येथे क्लिक करा