रोहित कणसे
सध्याच्या जीवनपद्धतीमध्ये फिटनेस खूप गरजेचा आहे. आजकाल लोक याकडे खूप लक्ष देत आहेत.
आजकालचे तरूण दिवसाचे काही तास जिममध्ये व्यायम करण्यात घालवताना दिसतात.
डॉक्टर सल्ला देतात की जर तुम्ही नियमीत व्यायम करत नसाल तर फक्त पायी चालून देखील स्वतःला निरोगी ठेवू शकतात.
तुम्ही देखील नियमीत व्यायम करत असाल तर काही महत्वाच्या चुका टाळणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला खूप गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जर तुमच्याकडे जिम ट्रेनर असेल आणि तुम्ही ओव्हर ट्रेनिंग करत आहात, तर याचे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात, यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता.
तुम्ही हेवी वर्कआऊट करत असाल आणि योग्य आहार घेत नसाल तर याचाही तुमच्या मेंटल हेल्थवर वाईट परिणाम होऊ शकतो.
व्यायम सुरू करण्याआधी बॉडी स्ट्रेच करणे खूप आवश्यक आहे, याशिवाय व्यायम करू नये.
जर तुम्ही जिममध्ये आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलत असाल किंवा जास्त व्यायम करत असाल तर हे चुकीचे आहे, असे करू नये.
वर्कआऊट केल्यानंतर शरीरात थकवा राहातो, त्यामुळे तुमची झोप पूर्ण होत नाही, यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ शकता.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या.
आंघोळीपूर्वी नाभीवर तूप लावा अन् मिळवा आरोग्यदायी फायदे; 'हे' आजार होतील दूर