सकाळ डिजिटल टीम
गरम मसाला शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थांमध्ये चव वाढवतात. दालचिनी, लवंग, वेलची आणि काळी मिरी यांसारख्या मसाल्यांचे मिश्रणा पासून गरम मसाला बनतो.
हवामान थंड होत असताना सर्दी आणि खोकला होण्याचा त्रास सामान्य आहे. गरम मसाल्यातील लवंग, काळी मिरी आणि दालचिनी सर्दी आणि खोकला लवकर बरे करण्यात मदत करतात.
गरम मसाल्यामुळे पचन सुधारते. दालचिनी आणि इतर मसाल्यांमधील फायबर नियमित आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन देतो.
गरम मसाल्यातील दालचिनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. हे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात उपयोगी आहे.
गरम मसाल्यांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सूज आणि वेदना कमी करण्यात मदत करतात.
जिरे आणि इतर मसाल्यांचे प्रमाण मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर आहे. गरम मसाल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेच्या समस्या दूर करतात.
जास्त गरम मसाले खाल्ल्याने मूळव्याध, छातीत जळजळ, आम्लपित्त आणि पोटात जळजळ होऊ शकते. अतिसेवन टाळा.