नामदेव शास्त्रींवरही दाखल झाले होते गुन्हे; प्रकरण काय?

सकाळ डिजिटल टीम

नामदेव शास्त्री

भगवान गडाचे विद्यमान महंत नामदेव शास्त्री यांच्याविरोधात आठ ते नऊ वर्षांपूर्वी काही गुन्हे दाखल झाले होते

भगवानगड

२०१६ मध्ये भगवान गडाच्या दसरा मेळाव्यावरुन वाद निर्माण झाला होता. तेव्हाच शास्त्रींवर गुन्हे दाखल झाले होते.

धमकी

३० सप्टेंबर २०१६ रोजी बीडच्या शिरुर पोलिस ठाण्यात शास्त्रींविरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल झाला होता.

केज

तत्कालीन केज पंचायत समितीचे सदस्य रामकृष्ण घुले यांनी नामदेव शास्त्रींविरोधात तक्रार दिली होती.

आचारसंहिता

दुसरं प्रकरण हे आचारसंहिता भंगाचं आहे. पाथर्डी पोलिस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला होता.

सूडभावना

हा गुन्हा राजकीय सूडभावनेने दाखल केल्याचा आरोप बाळासाहेब सानप यांनी केला होता.

पंकजा मुंडे

मुळात पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यावरुन २०१६ मध्ये वाद पेटला होता. त्यानंतरच हे गुन्हे दाखल झाले होते.

राजकारण

नामदेव शास्त्रींनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत, गडावर कसलंही राजकारण येऊ दिलं नव्हतं.

धनंजय मुंडे

मात्र धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिल्याने आणि संतोष देशमुख यांच्या आरोपींच्या बाजूने भूमिका व्यक्त केल्याने शास्त्री वादात अडकले आहेत.

प्रश्न

गडावरचं राजकारण संपलं म्हणणाऱ्या शास्त्रींनी पुन्हा राजकारणाला आणि पुढाऱ्यांना गडावर थारा का दिला? असा प्रश्न उपस्थित होतोय.