Monika Shinde
चॉकलेटी चव आणि क्रिमी फिलिंगमुळे ओरिओ बिस्कीट सर्वांचेच फेव्हरेट आहे. पण तुमहाला माहित आहे का, याच ओरिओपासून एक जबरदस्त गोड पदार्थ तयार करता येतो? चला तर मग, घरच्या घरी क्रंची ओरिओ रोल बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
Crunchy Oreo roll recipe
esakal
ओरिओ बिस्किट १५-२०, दूध – २-३ चमचे, पिठीसाखर – २ चमचे, खोबरे (बारीक कापलेले) २ चमचे, बदाम, काजू, पिस्ते – प्रत्येकी १ चमचा, तूप – १ चमचा
Crunchy Oreo roll recipe
esakal
ओरिओ बिस्किटांमधील क्रिम वेगळी काढा. नंतर बिस्किटे मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर तयार करा.
Crunchy Oreo roll recipe
esakal
बिस्किटाच्या पावडरमध्ये २-३ चमचे दूध घालून घट्ट पण मऊ कणिक तयार करा. लक्षात ठेवा, कणिक फार मऊ नसावी.
Crunchy Oreo roll recipe
esakal
वेगळ्या क्रिममध्ये पिठीसाखर आणि थोडे दूध घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
Crunchy Oreo roll recipe
esakal
कढईत तूप गरम करून त्यात बारीक खोबरे ५ मिनिटे हलके परतून घ्या. नंतर त्यात काजू, बदाम आणि पिस्ते घालून चांगले मिसळा.
Crunchy Oreo roll recipe
esakal
फॉईल पेपरच्या सहाय्याने बिस्किट आणि क्रिमचे मिश्रण हळूवारपणे रोल करा.
Crunchy Oreo roll recipe
esakal
रेड रोल किमान १ तास फ्रीजमध्ये ठेवा. नंतर त्याचे बारीक-वारी काप करून सर्व्ह करा.
Crunchy Oreo roll recipe
esakal
Jaggery Benefits: जेवणानंतर रोज गुळाचा १ तुकडा खाल्ल्याने काय फायदा होतो?