रोज 1 तास डान्स केल्यास मिळतात आरोग्याला 'हे' फायदे

Monika Shinde

कधी ना कधी डान्स केलंय

आपण सर्वांनी आयुष्यात कधी ना कधी डान्स केलंय कधी शालेय कार्यक्रमात, कधी मित्रांच्या लग्नात, तर कधी आपल्याच आनंदात डान्स करतो.

शारीरिक आणि मानसिक फायदे

पण डान्स केवळ मजा आणि आनंदापुरतं मर्यादित नसून, त्याचे अनेक शारीरिक आणि मानसिक फायदेही आहेत. चला तर मग जाणून घेऊया डान्सचे अद्भुत आरोग्यदायी फायदे.

संपूर्ण शरीराचा व्यायाम

डान्स करताना संपूर्ण शरीराची हालचाल होते, त्यामुळे तो एक परिपूर्ण व्यायाम प्रकार ठरतो. नियमित डान्स केल्याने शरीर लवचिक होतं. विशेष म्हणजे, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर डान्स हा एक उत्तम पर्याय आहे.

तणाव कमी करतो

डान्समुळे एंडॉर्फिन्स स्रवतात, जे नैसर्गिकरित्या मूड सुधारणारे रसायन आहे आणि ते तणाव व चिंता कमी करण्यास मदत करते. संगीतावर ठराविक लयीत हालचाल केल्यामुळे मन शांत होतं आणि शरीर व मनाला आराम मिळतो.

मूड चांगला करतो

डान्स करताना तुम्ही तुमच्या भावना मोकळ्या करतात. कधी आनंदात उड्या मारतात, तर कधी शांत गाण्यावर हलक्या हालचाली करतात. अशा वेळेस मनात चांगल्या भावना निर्माण होतात आणि उदासी दूर होण्यास मदत होते.

मनाची एकाग्रता वाढवतो

डान्स शिकताना किंवा नवीन स्टेप्स करताना मन एकाग्र लागतं. त्यामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. हे मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे

भावना व्यक्त करण्याचा सुंदर मार्ग

कधी कधी कोणती ही गोष्ट बोलून व्यक्त करता येत नसते. अशा वेळी भावना नृत्यातून सहज व्यक्त होतात. त्यामुळे नृत्य ही एक प्रभावी भावनिक थेरपीसुद्धा ठरते.

आंबा फळांचा राजा! पण कोण आहे फळांची राणी?

येथे क्लिक करा