पुजा बोनकिले
अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
हितशत्रुंचा त्रास संभवतो. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
काहींचा आध्यात्माकडे कल राहील. मनोबल कमी राहील.