पुजा बोनकिले
व्यवसायाची उलाढाल वाढेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
दैनंदिन कामे मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.
हितशत्रुंवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.
मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य उत्तम राहील.
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वादविवाद टाळावेत.
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
शत्रुपिडा नाही. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
आर्थिक निर्णय मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होईल.
जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.