Horoscope 15 November 2025: 'या' राशीच्या लोकांनी आपल्या मतांविषयी आग्रही राहाल

पुजा बोनकिले

मेष :

आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. वाहने जपून चालवावीत.

वृषभ :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मिथुन :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कर्क :

जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

सिंह :

आर्थिक लाभ होतील. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

कन्या :

दैनंदिन कामे मार्गी लागतील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

तुळ :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक :

प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

धनु :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

मकर :

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कुंभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मीन :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.