Horoscope 16 November 2025: 'या' राशीच्या लोकांचा प्रवास सुखकर होईल

गौरव देशपांडे

मेष :

कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृषभ :

संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

मिथुन :

प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील.

कर्क :

आत्मविश्‍वास व मनोबल वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

सिंह :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

कन्या :

उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

तुळ :

काहींचा आध्यात्माकडे कल राहील वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

वृश्‍चिक :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

धनु :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

कुंभ :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

मीन :

रखडलेली कामे मार्गी लागतील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.