पुजा बोनकिले
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.
आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.
प्रियजनांचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.