Horoscope 17 October 2025: 'या' राशीच्या लोकांना बौद्धिक क्षेत्रात सुसंधी लाभेल

पुजा बोनकिले

मेष :

मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

वृषभ :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन :

जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

कर्क :

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

सिंह :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी व आशावादी राहील.

कन्या :

महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

तुळ :

महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

धनु :

एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मकर :

वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

कुंभ :

अपेक्षित पत्र व्यवहार पार पडतील. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

मीन :

काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.