सकाळ वृत्तसेवा
महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.
तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
रखडलेली कामे दुपारीनंतर मार्गी लागतील. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे प्रस्ताव समोर येतील. प्रवास सुखकर होतील.
जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.