Horoscope 20 September 2025: 'या' राशीच्या लोकांचे बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल

पुजा बोनकिले

मेष :

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ :

तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

मिथुन :

जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कर्क :

जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

सिंह :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कन्या :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ :

प्रियजनांचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

वृश्‍चिक :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

धनु :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

मकर :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

कुंभ :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन :

हितशत्रुंवर मात कराल. कोणालाही जामीन राहू नका.