Horoscope 23 August 2025: 'या' राशीच्या लोकांचे वैचारिक परिवर्तन होईल

पुजा बोनकिले

मेष :

संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृषभ :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

मिथुन :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. काहींना नोकरीत बढतीची शक्यता.

कर्क :

आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. रखडलेली कामे मार्गी लागतील.

सिंह :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या :

वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

तुळ :

अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

वृश्‍चिक :

तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंंदिन कामे मार्गी लागतील.

धनु :

शासकीय कामे मार्गी लागतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मकर :

वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. वादविवाद टाळावेत.

कुंभ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मीन :

कोणालाही जामीन राहू नका. मनोबल कमी राहील.