Horoscope 25 August 2025: 'या' राशीच्या लोकांची जिद्द व चिकाटी वाढेल

पुजा बोनकिले

मेष :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृषभ :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मिथुन :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आरोग्य उत्तम राहील.

कर्क :

जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

सिंह :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. व्यवसायात वाढ होईल.

कन्या :

मन आनंदी व आशावादी राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तुळ :

वाहने सावकाश चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

वृश्‍चिक :

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

धनु :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर :

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कुंभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

मीन :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. उत्साह व उमेद वाढेल.