Horoscope 25 October 2025: 'या' राशीच्या लोकांनी वाहने जपून चालवावीत

पुजा बोनकिले

मेष :

दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.

वृषभ :

वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मन आनंदी व आशावादी राहील.

मिथुन :

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सिंह :

काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कन्या :

नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

तुळ :

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक :

मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्य उत्तम राहील.

धनु :

कोणालाही जामीन राहू नका. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मकर :

मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

कुंभ :

मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मीन :

गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.