Horoscope 26 October 2025: 'या' राशीच्या लोकांना जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल

पुजा बोनकिले

मेष :

महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ :

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मिथुन :

हितशत्रुंचा त्रास संभवतो. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कर्क :

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

सिंह :

बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. व्यवसायात वाढ होईल.

कन्या :

राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

तुळ :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक :

आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. जुनी येणी वसूल होतील.

धनु :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. वाहने जपून चालवावीत.

कुंभ :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मीन :

रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. उत्साह व उमेद वाढेल.